लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग, उड्डाणे रद्द   

लाहोर : पाकिस्तानच्या लाहोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग लागली. या आगीमुळे लाहोर विमानतळावरील सर्व उड्डाणे तात्काळ रद्द करण्यात आली. या आगीचे कारण अद्याप समजलेले नाही. मात्र या आगीमुळे पाकिस्तानात खळबळ उडाली.

लाहोर विमानतळावर अग्नितांडव

लाहोर विमानतळ हे पाकिस्तानामधील अति महत्त्वाचे विमानतळ आहे. याच आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशा प्रकारे आग लागल्याने मोठा गोंधळ उडाला. या आगीमागचे नेमके कारण काय हे अद्याप समोर आलेले नाही. आग विझवण्याचे , आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. विमानतळावर बरेच नागरिक उपस्थित आहेत. तेथील प्रवाशांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. प्रवाशांमध्ये या आगीच्या घटनेनंतर मोठा गोंधळ उडाला आहे. विमानतळावरील या अग्नितांडवामुळे पाकिस्तानची विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. आग लागल्यानंतर तेथील भागातही मोठी खळबळ उडाली आहे.

Related Articles